पहाटेची वेळ, सांर पुण गुलाबी थंडीत साखरझोपेत हेलाकावाने घेत होत. रामाच्या देवळात काकड आरतीचे सूर घुमत होते, दारातला पारिजातक आपल्या शुभ्र कोमल फुलांची बरसात करून चांदण्याचा आभास करत होता. फुलांच्या सुगंधाने वातावरण प्रफ्फुलीत होत होत. दारात रांगोळीचे रंग उमटत होते. अधून मधून एखादे वाहन रस्त्यावरून झर्रकन जाताना दिसत होते. आकाशात चंद्र आपल्या सौंदर्याची उधळण करत होता. इतक्यात आलार्म झाला , सुंदर स्वप्नाची रजई बाजूला सारून पुष्पा काकू जाग्या झाल्या. अंघोळ उरकून कामाला लागल्या , पुष्पा काकू म्हणजे एक अनोख व्यक्तिमत्व. उंची किमान पाच फूट , गोरी कांती , लांबसडक काळेभोर केस आणि रोज न चुकता त्यात माळलेल एखादे फुल, कपाळावर कुंकू आणि ओठांवर हसू. बहुदा त्यामुळेच त्याचं नाव पुष्पा असावे. घरात गडगंज संपत्ती पण त्यांनी कधीही त्याबद्दल गर्व बाळगला नाही. रोज स्वतःच्या हातांनी विणलेला फुलाचा हार घेऊन नागेश्वरला जायच्या. आतापर्यंत तर त्या नागेश्वरालाही पुष्पा काकूंच्या हराशिवाय पूजा झाल्यासारखे वाटत नसेल. घरातील सगळी कामे त्या स्वतः करायच्या आणि रोज दुपारी न चुकता आमच्या घरी गप्पा मारायला यायच्या.. आता पुष्पा काकू पुण्यात नाहीत परंतु त्यांच्या आठवणी आजून त्या वाड्यात दरवळत आहेत. त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो. २ वर्षे झाली त्या अमेरिकेला गेल्या आहेत. पहाटेचा चंद्र आणि देवळातला नागेश्वर आजूनही त्याची वात पाहत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा