शुक्रवार, १८ मार्च, २०११

31 december

३१ डिसेंबरची सकाळ उगवली, खिडकीतून सूर्यदेव डोकाऊ लागले आणि मला झटकन जाग आली. आज काहीतरी स्पेशल होते आणि ते म्हणजे माझ्या काकाचा वाढदिवस.  दरवर्षीप्रमाणे पुण्याहून  काका, काकू आणि आमचे  चार  बंधुराजे येणार होते. त्यामुळे घरातील सगळेच आनंदात होते. आईचा हात घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत होता.सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. घरातील आवरेपर्यंत दुपार लोटली आणि दारावरची बेल वाजली. दार उघडताच .मावळे देखील शत्रूवर जेवढ्या वेगाने  आक्रमण करत नसतील  तेवढ्या वेगाने पुण्याचे सैन्य  घरात गुसले आणि थेट हॉलमधील टेबल fan वर धडकले . त्या प्रसंगानंतर त्या  fan ला जी मानमोडी झाली ती कायमची.  या वरून तुम्ही अंदाज घेतलाच  असेलच कि घरात पुढे काय काय झाले असेल. तसे तर लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंबात राहिलो  असल्यामुळे आम्हाला या सगळ्याची सवय झालेली. दुपारची जेवणे आटोपली काकू आणि आई गप्पा गोष्टी करण्यात गुंतून गेल्या. बायका एकदा गप्पा मारायला लागल्या कि त्यांना वेळ पुरत नाही हे काय वेगळे सांगायलाच नको आणि त्यातल्या त्यात आमची काकू म्हणजे गप्प राहिली ती काकू कसली. बर्थडे बॉय शांत झोपी गेला होता.आणि आमचे मावळे पुन्हा युद्धाचे रणशिंग फुंकून युद्ध  करण्यात गुंतून गेले होते.तेवढ्यात फोनेची रिंग खनानु लागली. तासाभरातच पप्पा ऑफिसातून  घरी येणार होते.संध्याकाळ  झाली केक कापून बर्थडे साजरा झाला. आई आणि काकूने चिकन बिर्याणीचा बेत केला होता. जेवंन झाली आणि नवीन वर्षाच्या सहलीबद्दल प्रत्येकजण आप आपले ठराव मांडू लागले.आलिबाग, गणपती पुळे,माथेरान अशा वेगवेगळ्या ठिकाणाची यादीच तयार झाली आणि सर्वमताने माथेरान या ठिकानाचा ठराव पास झाला. सकाळच्या प्रवासाने थकलेले आमचे हिरे लवकरच झोपी गेले आणि स्वप्नांच्या दुनियेत फिरता फिरता सकाळी लवकरच उठले.माथेरान ला जाण्याची तयारी झाली. २ दिवस राहण्याचा बेत होता. सकाळी ८ वाजता आम्ही घर सोडले. लोकल ट्रेन ने नेरळ स्टेशन पर्यंत गेलो तिथून माथेरान ला जाण्यास जवळ जवळ एक ते दीड तास लागला.माथेरान ला पोहचल्यावर आम्ही पहिल्यांदा हॉटेल बुक केल थोडा वेळ आराम केला आणि माथेरान चे सोंदर्य पाहण्यासाठी बाहेर पडलो. गार वारा सुटला होता.घोड्यांच्या टापा वाजत होत्या आम्ही बाजारपेठेच्या दिशेने चालत होतो. तेवढ्यात फुलरानीने होर्न दिला. आम्ही बाजारपेठेत गेलो थोडी फार खरेदी केली. आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेट point  च्या दिशेने चालू लागलो. माकडांना शेंगदाणे चारत आम्ही sunsetpoint पर्यंत पोहोचलो येत जाता नवीन जोडपी दिसतच होती. थंड वातावरणाचा पुरेपूर उपयोग करत होती. आम्ही सूर्यास्त बघितला फोटो काढले. आणि परत निघालो बाजारपेठेत आल्यावर तेथील बागेत बसलो. ती बाग खरच खूप सुंदर होती. लहान मुले खेळत होती. आमचे बंधुराज हि इकडे तिकडे बागडत होते अधून मधून काहीतरी खोड्या करून काकूचा मार मात्र न चुकता खात होते..दुसऱ्या दिवशी इक्को point , लॉर्ड point  बघितला आणि आजून काही point पाहून आम्ही परतीच्या वाटेवर चालू लागलो. येताने मात्र आम्हाला अथक परिश्रमानंतर  फुलराणीचे तीकित मिळाले. गाडीत बसल्या बसल्या काकूचा हात अभी (लहान भाऊ)च्या  पाठीवर पडला आणि अभिच्या सनयीने आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.दोन्ही बाजूने गर्द झाडी आणि त्यातून चालणारी फुलराणी,. येता येता  कड्यावरच्या गणपतीचे दर्शन झाले. नेरळ स्टेशन आले आणि आमच्या  सहलीची सांगता झाली..........कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा